Headlines

जातेगावसह तालुक्याच्या वैभवात भर पडेल : आमदार काशिनाथ दाते सर

श्री भैरवनाथ देवस्थानच्या विकासकामांना ₹१ कोटी ५४ लाख पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार  काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जातेगाव ता. पारनेर येथे होणाऱ्या विविध विकासकामांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना “ब वर्ग” अंतर्गत या कामांना एकूण…

Read More

पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; इच्छुक उमेदवारांनी कसली कंबर

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या सोडतीनुसार, विविध गट आणि गणांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये जवळा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष), सुपा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), टाकळी ढोकेश्वर गट सर्वसाधारण (महिला), ढवळपुरी गट सर्वसाधारण (महिला) आणि निघोज…

Read More

“वैश्विक शिखर समिट २०२५” मध्ये पारनेर येथील सेवाधारींचा सहभाग

पारनेर / भगवान गायकवाड, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पारनेर केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी साधना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाधारींचा नुकताच राजस्थान मधील माउंट आबू येथील संस्थेच्या मुख्यालयात वैश्विक शिखर समिट २०२५ मध्ये पारनेर येथील सेवाधारींनी एकता आणि विश्वास आदर्श भविष्यासाठी प्रेरणा या विषयासाठी सात दिवसीय अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला.राजयोग ध्यानधारणा, आध्यात्मिक ज्ञान आणि स्व-परिवर्तनाच्या गहन…

Read More

‘हॉटेल राजदरबार’चे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन!

पारनेर, /प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील माळकूप गावात नगर–कल्याण महामार्गालगत नव्याने उभ्या राहिलेल्या “हॉटेल राजदरबार” या भव्य हॉटेल व्यवसायाचे उद्घाटन पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार श्री. काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते थाटामाटात संपन्न झाले. या सोहळ्याने माळकूप गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदार काशिनाथ दाते यांनी हॉटेलचे मालक व माळकूपचे आदर्श सरपंच संजय काळे यांचे अभिनंदन करताना सांगितले, “हॉटेल राजदरबार…

Read More

भाऊबीज निमित्त स्नेहालय संस्थेकडून ‘माहेरची साडी’साठी मदतीचे आवाहन

पारनेर / भगवान गायकवाड, मागील दोन दशकांच्या यशस्वी परंपरेनुसार यंदाही अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेने वंचित भगिनींसाठी दिवाळीच्या मंगलमय पर्वात ‘माहेरची साडी’ या हृदयस्पर्शी उपक्रमाचे आयोजन केले आहे. दिवाळीच्या सणासुदीला आपल्या आप्तस्वकीयांना भेटवस्तू, फराळाचे पदार्थ आणि मिठाई देण्याची आपली संस्कृती आहे. ज्या माता-भगिनींना भाऊ आणि माहेरचा आधार असतो, त्यांच्यासाठी दिवाळीतील भाऊबीजेचा दिवस अतिशय खास आणि महत्त्वाचा…

Read More

ओंकार आयुर्वेदिक व पंचकर्म पॅरॅलिसिस सेंटर, सुपा येथे दिवाळीनिमित्त ‘अभ्यंग व उद्धर्तन’ चिकित्सा!

पारनेर / भगवान गायकवाड, दिवाळी, हा सण म्हणजे उत्साह, आनंद आणि नवीन आरोग्यदायी सुरुवात! याच मंगलमय मुहूर्तावर, सुपा येथील ओंकार आयुर्वेदिक व पंचकर्म पॅरॅलिसिस सेंटरने नागरिकांसाठी एक विशेष भेट आणली आहे. सेंटरने दिवाळीच्या सणानिमित्त, पारंपारिक आणि शाश्वोक्त पद्धतीने ‘अभ्यंग व उद्धर्तन चिकित्सा’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. आरोग्य, सौंदर्य आणि मानसिक शांतता यांसाठी आयुर्वेदामध्ये अभ्यंग…

Read More

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड

पारनेर / भगवान गायकवाड, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. पारनेर येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीमध्ये संघटनेच्या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी विविध महत्त्वाच्या पदांवर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. या निवड प्रक्रियेत बाळशिराम पायमोडे…

Read More

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे : आ. काशिनाथ दाते सर

जामगाव येथे ५८ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील जामगाव येथे शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून, ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण…

Read More

सैन्य दलात विकास करंजुले बनले नायब सुभेदार: पाडळी रांजणगावचा सुपुत्र नावारूपाला!

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील सुपुत्र विकास (माऊली) शिवाजी करंजुले यांनी भारतीय सैन्य दलात ‘नायब सुभेदार’ या महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती मिळवून गावचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल नुकताच गावी परतल्यावर डी.बी. (आण्णा) करंजुले मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. ब्रिटनिया डेअरीचे चेअरमन नितीन साठे आणि…

Read More

जातेगाव परिसरात बिबट्याची दहशत: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पारनेर / भगवान गायकवाड,        पारनेर तालुक्यातील जातेगाव परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः राळेगण सिद्धी रोडवरील खोमदरा भागात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले असून, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राळेगण…

Read More