प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राचा सामाजिक उपक्रम
पारनेर / भगवान गायकवाड,
मळगंगा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा करंदी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र यांच्या विद्यमाने “मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अभियान कार्यक्रम अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गुलाब वाळुंज ( सर) होते ,तर प्रमुख उपस्थिती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी साधना दिदी, दत्तात्रय रोकडे (सर), राम भाई,शिक्षिका पवार सुनंदा बबन, पायमोडे संगीता,शोभा भांबरे,शिक्षक गायकवाड रवींद्र बाबुराव, लेंडे किशोर पंढरीनाथ, चौधरी अंकुश रामभाऊ, ठाणगे दादाभाऊ दशरथ, खोडदे बाळू ठकाजी, राजेश भगवान केदार, संदीप सुबे, नंदकुमार थोरात, मोहिनी घुले, अक्षय गळाबे, संदीप सुंबे, आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी विद्यार्थ्यांना मुल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या वर्तमान स्थितीत प्रत्येक मानवाचे जीवनात ताणतणाव आणि आवाहने मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ताणतणावाचा आधार घेऊन मानव तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू, आणि मादक पदार्था या सारख्या व्यसनाच्या पूर्ण आहारी गेला आहे. त्या मुळे स्वतःचे शरीर संपदा बरोबर कुटुंबाची आणि समाजाचीही हानी होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मानवाला राजयोग ध्यान हा मनशांती साठी एकमेव उपाय आहे. योगा हा केवळ शारीरिक व्यायाम पुरता मर्यादित नाही तर तो मन, शरीर आणि आत्मा यांचे पोषण करणारा एक समग्र दृष्टिकोन आहे. जो सर्वांगीण आरोग्य सुधारण्यास मदत करत असतो. योगा मुळे मेंदूमधील ग्रे मॅटर वाढतो आणि मेंदूतल्या महत्वाच्या कामात सुधारणा होते. त्या मुळे लोकांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत असते. त्या मुळे जीवनात प्रत्येकाने व्यसन करणाऱ्या व्यक्तीने दररोज राजयोग ध्यान करणे जरुरीचे आहे. त्या मुळे स्वतःची शरीर संपदा निरोगी राखण्यास मदत होईल. आणि जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी राहील.
सूत्रसंचालन दत्तात्रय रोकडे सर यांनी केले तर आभार ईश्वरीय परिवार यांनी मानले.




