वासुंदे सेवा सोसायटीतर्फे कर्जदार सभासदांचा मोफत विमा
सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
पारनेर/प्रतिनिधी :
वासुंदे सेवा सोसायटीच्या वतीने कर्जदार सभासदांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा काढण्यात आला. या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी उपसरपंच शंकर बर्वे, सोसायटीचे चेअरमन सूर्यभान भालेकर , व्हा. चेअरमन लक्ष्मण झावरे, शरदराव पाटील, माजी चेअरमन नारायण झावरे, पो. मा. झावरे, बापूसाहेब गायखे, विकास झावरे, बाळासाहेब वाबळे, रा. बा. झावरे, पोपट हिंगडे, बाळासाहेब झावरे, नाना वाबळे, दिलीप पाटोळे, पी. डी बर्वे, मारुती उगले, सेवा सोसायटीचे सचिव श्री बांडे व श्री भांड तसेच ग्रामविकास अधिकारी भास्कर लोंढे आदी उपस्थित होते.
या योजनेमुळे कर्जदार सभासदांना आर्थिक सुरक्षितता मिळणार असून, अपघातजन्य परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल. सुजित झावरे पाटील यांनी यावेळी बोलताना सोसायटीच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असल्याचे सांगितले. चेअरमन सूर्यभान भालेकर यांनी सांगितले की, सभासदांच्या कल्याणासाठी सोसायटी नेहमीच प्रयत्नशील आहे आणि भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सभासदांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सोसायटीच्या या सामाजिक पुढाकाराने गावातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या योजनेमुळे कर्जदार सभासदांना आर्थिक संरक्षण मिळणार असून, त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता कमी होण्यास मदत होईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



