पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील सुपा येथील दिवटे पाटील पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन निमित्त कब-बुलबुल व स्काऊट-गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील जास्तीत जास्त लोक साक्षर व्हावेत यासाठी विविध मार्गाने जनजागृती करून जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

जागतिक साक्षरता दिन जनजागृती मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सुपा गावात प्रभात फेरी काढून जागतिक साक्षरता दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा केला. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अहिल्यानगर भारत स्काऊट-गाईड जिल्हा कार्यालयाकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्काऊट-गाईडचे शिक्षक तेजस, संतोष पळसकर व सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष ॲड. शहाजीराव दिवटे यांच्याकडून कौतुक करण्यात आले.