पारनेर / भगवान गायकवाड,
विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असले तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे, खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या कामाचे तास वाढवून त्यांच्या आरोग्याचे भांडवलदारांकडून शोषण केले जाणार आहे तसेच कापसावरील आयात शुल्क रद्द करणे व सोयाबीन पेंड आयात करुन सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे हे कामगार व शेतकरी विरोधी निर्णय शासनाने मागे घ्यावेत या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व महाविकास आघाडीच्या वतीने पारनेर तहसील कार्यालयाच्या समोर निदर्शने करून तहसीलदार गायत्री सौदाने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी भाकप तालुका सचिव कॉ संतोष खोडदे यांनी जनसुरक्षा कायद्या संदर्भात राज्य भरातून १३००० हरकती दाखल करण्यात आलेल्या होत्या . त्यापैकी ९५०० हरकती सदर विधेयक रद्द करा हे स्पष्ट मांडणा-या होत्या. तसेच हा कायदा संविधानिक कक्षेत काम करणा-या , संघटना व कार्यकर्त्यांची देखील मुस्कटदाबी करणारा, सरकार व सरकारी यंत्रणा यावर टीका करणा-या , सरकारी धोरणांची चिकित्सा करणा-या कोणत्याही अहिंसक कृतीवर बंधन आणू शकतो इतकी कायद्यातील कलमे ढोबळ व पसरट आहेत. त्यामुळे हा कायदा सरकारने रद्द करण्याची मागणी केली.
किसान सभेचे तालुकाध्यक्ष सुभाष ठुबे यांनी तालुक्यात जंगली प्राण्यांच्या हल्यात दगावलेल्या नागरीकांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.


किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बबनराव पाटील यांनी बोलताना शासनाने कापसावरील आयात शुल्क रद्द करुन व सोयाबीन पेंड आयात करुन शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे हे निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी भाकपचे तालुका सहसचिव कैलास शेळके कान्हुर पठारचे माजी सरपंच गोकुळ काकडे उपसरपंच सागर व्यवहारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय भगत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे देवदत्त साळवे, प्रसाद नवले, गोविंद ठुबे, विशाल लोंढे, नामदेव ठुबे,वैभव साळवे,जयसिंग गायकवाड, बबन जोशी, शंकर ठुबे, चैनाजी वाळूंज, विशाल शिंदे, सतीश ठुबे, हरिभाऊ गायकवाड, विजय थोरात, गणेश ठुबे, भागवत गायकवाड, गणपत ठुबे, दीपक गायकवाड, श्रीधर साळवे, सुलाबाई आदमाने मैनावती दिवेकर, रखमाबाई शेळके, लिलाबाई साळवे, यांचे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते निदर्शने साठी उपस्थित होते.