
न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
पारनेर / भगवान गायकवाड, येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, ५ सप्टेंबर, हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकाची भूमिका साकारली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध विषयांचे अध्यापन…