घरेलू कामगार महिलांच्या सशक्तीकरणाचा नवा अध्याय — स्नेहालयच्या ‘उमेद प्रकल्पा’तर्फे आय-कार्ड व साडी वाटप सोहळा उत्साहात साजरा
पारनेर / भगवान गायकवाड, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या स्नेहालय संस्थेच्या ‘उमेद प्रकल्पा’तर्फे घरेलू कामगार महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. रहमत सुलतान फाउंडेशन, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांना महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र (आय-कार्ड) आणि दिवाळीनिमित्त ‘माहेरची साडी’ देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे सेवावस्तीतील १०८ एकल,…


