कन्हैया ऍग्रो कंपनीच्या सेस फंडातून जि. प. प्राथमिक शाळा गटेवाडीसाठी वॉल कंपाऊंड आणि टॉयलेट सुविधा
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा गटेवाडी येथे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर घालणारा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कन्हैया ऍग्रो कंपनीच्या सेस फंडातून शाळेसाठी वॉल कंपाऊंड आणि टॉयलेट बांधकाम प्रकल्पाचा भूमिपूजन शुभारंभ नुकताच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.कन्हैया ऍग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश पठारे यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन…


