‘आरोग्य सक्षमीकरण, जीवन समृद्ध करणे’ कार्यशाळेला पारनेर कॉलेजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये नुकतीच ‘आरोग्य सक्षमीकरण, जीवन समृद्ध करणे’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित एकदिवसीय आरोग्य आणि स्वच्छता कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महत्त्वपूर्ण उपक्रमाला विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य आणि…


